Daily Archives: January 27, 2023

Republic Day Celebration

भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०२३ रोजी धरमपेठ शिक्षण संस्थेचे धरमपेठ पॉलिटेक्निक येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.

धरमपेठ पॉलिटेक्निकचे अध्यक्ष मा. श्री सुरेश देव, प्राचार्या मीता फडणवीस, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थितीत धरमपेठ पॉलिटेक्निकच्या कर्मचाऱ्यांतर्फे देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

कल्पना माहुरकर, स्नेहल खंडागळे, मयुरेश गोखले आणि अमेय ओझरकर यांनी विविध गीते सादर केलीत. यावेळी धरमपेठ पॉलिटेक्निकचे कर्मचारी श्री सुरेश चापले यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन स्नेहल खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता मयुरेश गोखले, राजेश पंडित तथा सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

धरमपेठ पॉलिटेक्निक
नागपूर